‘तो’ मेसेज आला अन आ. लंके यांनी वृद्धाश्रमासाठी केले ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   आ. निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे चालवली आहेत.

कोरोनाच्या काळात त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचे दातृत्वाच्या चर्चाही अनेकदा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.

आ. लंके यांच्या व्हाट्सअप वर नेवासा फाटा येथील वृद्धाश्रम चालवत असलेल्या केंद्रचालकांनी किराणामाल मिळेल का? असा मेसेज गुरुवारी सकाळी टाकला.

या मेसेजला आमदार निलेश लंके यांनी यांनी काही मिनिटात प्रतिसाद देत जवळपास‌ १ महिना पुरेल एवढा किराणामाल त्यांनी पोहोच केला.

नेवासा फाटा येथील वृध्दाश्रमाचे चालक रावसाहेब मगर हे गेल्या अनेक वर्षापासून वृद्धाश्रम चालवित असून या वृद्धाश्रमात धान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

परंतु किराणामाल संपला असल्याकारणाने मगर यांनी यासंबंधीचा मेसेज आमदार निलेश लंके यांना व्हाट्सअप वर टाकला. याची तातडीने दखल घेत निलेश लंके यांनी या वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी ४० किलो साखर, एक तूप डब्बा,

एक गोड तेल डबा, दहा किलो बेसन पीठ, हरभरा डाळ, तुर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, पाच किलो खोबरे, साबण, दहा किलो शेंगदाणे अशी एकूण महिनाभर पुरेल एवढे किराणामाल वृद्धाश्रमात गाडी भरून पोहोच केला आहे.

माझ्या आयुष्यातील मागचे गरीबीचे दिवस मी विसरलो नाही. गरीबी मी पाहिलेली आहे भोगलेली आहे त्यामुळे माझ्या परीने ज्या ज्या गोरगरीब वंचित घटकांना भविष्यात ज्या परीने मदत करता येईल, त्या परीने मदत करणार आहोत.

मग तो कुठल्याही मतदारसंघातला असो वा कुठल्याही राज्यातला अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment