अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह तरुण व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीरामपूर विधानसभा पदाधिकारी तसेच शहरातील तरुण व्यापार्‍याचा करोनाने मृत्यू झाला. तसेच एकूण काल नव्याने 20 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

काल नगर येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत तालुक्यातील 02 जण तर खासगी प्रयोगशाळेत 18 असे एकूण 20 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 4011 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 925 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

आजपर्यत 25 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 924 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 43रुग्ण करोनावर मात करून काल घरी परतले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment