Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

‘या’ पोलीस चौकीजवळील बंद सिग्नल ठरतोय डोकेदुखी

0

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवर वाहनांची चांगलीच वर्दळ सूर झाली आहे. कोरणापासून बचावासाठी मास्क घालत नियमांचे पालन केले जात आहे.

परंतु रस्त्यावरील सिग्नल सुरू असताना वाहन न थांबणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे या गोष्टी अपघातास कारणीभूत ठरतात.

दरम्यान शहरातील पत्रकार चौक हा नेहमीचेच वर्दळीचे ठिकाण असून या चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची रेलचेल असते. दरम्यान या चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे या चौकातून वाहनचालक अस्ताव्यस्त जाताना दिसतात.

या प्रकारामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सिग्नल तात्काळ दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच या चौकात शहर वाहतूक शाखेचे कार्यालय असून तरी देखील या चौकात वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसून येत असतो.

अपघाताचे प्रमाण वाढू नये यासाठी तात्काळ या चौकातील सिग्नल दुरुस्त केला जावा तसेच या ठिकाणी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

li