अहमदनगर जिल्ह्यातील प्रेम प्रकरणातून घडलेले ‘ते’ हत्याप्रकरण सीआयडी व सीबीआयकडे देण्याची मागणी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत असतानायाचा तपास त्वरीत सीआयडी व सीबीआयकडे देण्याच्या मागणीचे निवेदन एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

यावेळी राज्य अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष सुभाष पवार, लहू पवार, प्रदेश सरचिटणीस दत्ता माळी, संतोष गांगुर्डे, पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सुदाम मोरे, बाळासाहेब गांगुर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष साळूबाई माळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अंजली पवार आदी उपस्थित होते.

मयत अक्षय उर्फ किरण लहू पवार हा संकेत सुपेकर यांच्या कुटुंबीयांकडे पोल्ट्री फार्ममध्ये शेडच्या अँगलला मृत लटकलेला त्याचे वडिल लहू पवार यांना आढळून आला होता. मयताकडे हस्तलिखित असलेली चिट्टी आढळून आलेली आहे. मयताचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते.

या प्रेमसंबंधातून आणि मयतास मुलीचा भाऊ नातेसंबंधातील युवक सचिन वराळ, रोहिणी वराळ व अन्य नऊ व्यक्तींनी त्रास दिलेला आहे. हे सर्व निघोज गावातीलच आहे. घटनेच्या दिवशी चार चाकी गाडी मध्ये आरोपींनी येऊन मयत युवकास धमकी दिली होती. त्यानंतर मयत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.

या सर्व घटनेनंतर वीस दिवस उलटले आहे. परंतु मृत्यू पूर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार या प्रकरणातील आरोपींना पोलीसांनी गुन्हा नोंद होऊनही अटक केलेली नाही. पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जाण्यास वेळ देत असल्याचा

आरोप एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. मयत अक्षय उर्फ किरण पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या इसमांना वाचवण्यास संशय उत्पन्न होईल अशी भूमिका पोलीस प्रशासन घेत आहे. आता पर्यंत आरोपींनी वापरलेली गाडी, मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले नाही.

किरण पवारला धमकाविण्यासाठी कोण आले होते यांची देखील विचारपूस करण्यात आलेली नाही. पवार कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर प्रकरणाचा तपास सीआयडी व सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment