Ahmednagar CityAhmednagar News

केडगाव ते मेहेरबाबा रस्त्याचे काम मार्गी लावा : मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  केडगाव ते मेहेरबाबा हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मेहेरबाबा हे एक अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व एक धार्मिक स्थळ आहे.

त्यामुळे या मार्गावरुन अनेक भाविक ये-जा सुरु असते. या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमी घडत आहेत.

तसेच या रस्त्यावरून मोहिनीगर, आदर्शनगर, दूधसागर सोसायटी, शहरातून व उपनगरातून नागरिक मेहेरबाबाकडे जात असताना त्यांना रस्ता खराब असल्यामुळे अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

तरी या रस्त्याचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण करावे, अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये सदर परिसरातील नागरिकांसह तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,

याची दखल घ्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button