Ahmednagar News

राजकीयद्वेषापोटी 120 सभासदांना कर्ज देण्यास टाळाटाळ

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- निंबोडी (ता. नगर) येथील मल्हार निंबोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या 120 सभासदांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने

तातडीने कर्ज मिळण्याची मागणी नगर तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे सभासदांनी केली होती तर राजकीयद्वेषापोटी सदरील कर्जप्रकरणे प्रलंबीत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी भैरवनाथ बेरड,

जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, माजी सरपंच संदीप पानसरे, जयराम बेरड, अंबादास बेरड, शहनवाज शेख, अमित गांधी, गणेश निमसे, अजय सोळंकी, गणेश काकडे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. सदर सहकारी संस्थेच्या 120 सभासदांनी संस्थेच्या उपविधी प्रमाणे व सहकारी बँकेच्या धोरणानुसार

कर्ज मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे दिली. वेळोवेळी कर्जाची मागनी केली. मात्र बर्‍याच कालावधीपासून संस्थेने राजकीयद्वेषातून कर्ज प्रकरणे मंजूर केलेली नाहीत. संस्थेने वेळकाढूपणा केला आहे. संस्थेच्या पदाधिकारी व सचिवांनी आंम्हाला कर्ज देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.

त्यामुळे 120 सभासद कर्जापासून वंचित राहिलेले आहे. तर कर्ज मिळण्याची मुदत संपत आलेली असून, याप्रकरणी न्याय मिळण्याचे निवेदनात म्हंटले आहे. नगर तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांनी संस्थेला 24 तासात मिटिंगचा अजेंडा जाहीर करून सदर प्रकरण मार्गी लावण्याचे पत्र पाठविले आहे.

अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता तरीदेखील काही कारवाई झाली नाही त्यामुळे जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले व नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाले व जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर

यांनी लेखी पत्र दिले की अठरा तारीख पर्यंत सोसायटीने कर्ज वाटप न केल्यास 19 तारखेला आम्ही स्वतः प्रशासक नेमून शेतकऱ्यांचे प्रलंबित खरीप कृषी कर्ज वाटप सुरळीत करून देण्यासाठीचे लेखी आश्वासन पत्र दिले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button