जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची आज कोरोना टेस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची आज रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.

नगर जिल्ह्यात करोनाचा वेगाने फैलाव होत असून नगर जिल्हा परिषदेतही अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित आढळून आले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने सर्वच जि. प. कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करावी, अशी मागणी केली होती.

या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मंगळवारपासून या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके

यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले असून सर्व कर्मचाऱ्यांना रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी जिल्हा परिषद मुख्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या ५० टक्के कर्मचारी जिल्हा परिषदेत येत असले तरी उर्वरित कर्मचाऱ्यांनीही टेस्ट करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment