येथील सरकारी कार्यालयाला बिबट्याची रखवाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-अकोले येथील वीज केंद्राच्या गेटजवळ चक्क बिबट्या रखवालदार बनल्याने तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे. चक्क महिना उलटून गेला तरी बिबट्या मादी कोदनी वीज प्रकल्पात ठाण मांडून आहे.

वन विभागाने गेट उघडे ठेवण्यास सांगितले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. वन विभागाने गेटजवळ शेळी ठेवून पिंजरा लावूनही हा बिबट्या तिच्याकडे ढुंकून पाहत नाही.

आता तर बिबट्या मादी थेट कार्यालयाच्या गेटवर येऊन बसू लागल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांना ना आत जाता येईना ना बाहेर पडता येईना.

आतले लोक आत बाहेरचे लोक बाहेर काही कर्मचारी भीतीपोटी रजेवर जाण्याच्या मानसिकतेत आहे. एवढा प्रकार घडलेला असताना वनविभाग मात्र निवांत आहे. वनविभागाच्या कामचुकारपणामुळे कोदणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिबट्या मादीने या भागात दहशत निर्माण केली आहे. ती जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्ती कर्मचारी ग्रामस्थ यांच्यावर ती झडप घालून हानी पोहचवू शकते. त्यापूर्वीच तिचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

वन विभागाचे डीएफओ या तालुक्यात येऊन गेले. त्यांना याबाबतची कल्पना देऊनही त्यांनीही याबाबत असमर्थता दाखवली. बिबट्या मादी जोपर्यंत नुकसान करत नाही.

तोपर्यंत वनविभाग निर्णय घेणार नाही असे दिसते. शेळी, पिंजरा, गार्ड देऊन वन विभाग मोकळे हात करून आपल्या कामाला लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment