कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर शहरासह तालुक्यात मास्कचा वापर, सॅनिटायझर सह फिजिकल डिस्टन्सिंगचा स्वैराचारी नागरिकांनी फज्जा उडवला असल्याने तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असून तालुक्याचा आकडा ९६८ वर जाऊन पोहोचला.

सुमारे २५ बधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक त्याला सपशेल हरताळ फासताना दिसत आहेत.

श्रीरामपुरात अनेक कुटुंब प्रमुखांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यातील अनेकांची मुले लहान आहेत. कुटुंबाचे ते एकमेव आधारस्तंभ होते कौटुंबिक भिस्तच त्यांचेवर होती. कुटुंबाचा पोशिंदाच गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत.

हाच विचार प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबाबत करून धडा घेण्याची गरज आहे. नियमांची एैसीतैसी, रुग्णांचा आकडा ९६८ वर पोहोचला आहे, शहरासह तालुक्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांची ऐशितैशी होत आहे.

शहरातील संजीवनी रुग्णालय रस्त्यावर भाजीपाला बाजार भरत आहे. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, विक्रेते अन ग्राहक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

मेनरोड व शिवाजी रोडसह इतर मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेक दुकानातही फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडतो आहे.

नगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करायला गेले तर वादविवाद होतात. त्यामुळे कर्मचारीही बचावात्मक पवित्रा घेत आहेत. तर दुसरीकडे मास्क न

वापरणे व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करतात. आतापर्यंत सुमारे पंचवीस बधितांचा मृत्यू झाला आहे मात्र कोणीही धडा घेत नाहीत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment