पोटे दाम्पत्याविरोधातील याचिका फेटाळली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- नगराध्यक्ष शुभांगी पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून नंतर भाजप उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पुन्हा काँग्रेसचे काम सुरू केल्याने पोटे दाम्पत्याला अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख,

राष्ट्रवादीचे ऋषिकेश गायकवाड, सतीश बोरुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. सोमवारी सुनावणी होऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याचिका फेटाळली. अधिकार नसताना याचिका दाखल करणाऱ्यांना दंड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment