‘ह्या’ दोन खासगी कोव्हिड रुग्णालयांवर होणार कारवाई? ; केलंय ‘असे’ काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोएचे थैमान वाढत आहे. अशात प्रशासन तसेच अनेक वैद्यकीय कर्मचारी जनतेची सेवा करत आहेत.

परंतु यामध्ये काही खासगी रुग्णालयांमध्ये लूटमार होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील लाखापुढील बिले तपासणीसाठी सहा भरारी पथकाची स्थापना केली.

या भरारी पथकात महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या समितीने मागविलेल्या बिलांबाबत ते देण्यास सावेडीतील पटियाला हाऊसमधील अहमदनगर कोव्हिड सेंटर आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांनी टाळाटाळ केल्याने

त्या दोन खासगी कोव्हिड सेंटरवर कारवाई करण्याच्या हालाचाली जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सुरू आहेत. जिल्हा प्रशासन या कोव्हिड रुग्णालयावर काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

नोटीस देऊनही या दोन रुग्णालयांनी कोणतीच माहिती समितीला दिलेली नाही. किती रुग्ण अ‍ॅडमीट आहेत, किती बाधितांवर उपचार केले, किती डिस्चार्ज झाले याबाबतची कोणतीच माहिती या दोन्ही कोव्हिड सेंटरने दिलेली नाही.

नोटीस देऊन आठ दिवस झाले असूनही माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही सेंटरची मान्यता रद्द करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात सुरू आहेत.

दरम्यान, समितीने एक लाखापेक्षा अधिक रकमेची 201 बिले असणाऱ्या बिलांपैंकी 157 बिलांची समितीने तपासणी केली. त्यामधील 76 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

त्रुटीमधील या बिलांमध्ये 12 लाख 85 हजार रुपये वसुलीस पात्र असल्याचा अभिप्राय समितीने नोंदविला आहे. समितीने संबंधित हॉस्पिटलला नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment