दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे आणखी ११ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ३८९ झाली आहे. बाधितांची संख्या २७ हजार १०९ झाली आहे.

मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत २२८, खाजगी प्रयोगशाळेत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १, नेवासे ४, श्रीगोंदे २, पारनेर १, राहुरी २, शेवगाव ४८, कोपरगाव १, जामखेड ५,

मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्ह्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १३३, संगमनेर १, राहाता १२,पाथर्डी ३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ७, कॅन्टोन्मेंट २, नेवासे १,

श्रीगोंदे ५, पारनेर ६, राहुरी १३, शेवगाव २, कोपरगाव ६, जामखेड ५ आणि कर्जत ३ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत संगमनेर १९, राहाता १४, नगर ग्रामीण २,

श्रीरामपूर १५, नेवासे ३१, श्रीगोंदे १५, अकोले ४, राहुरी २, शेवगाव २०, जामखेड २८ आणि कर्जत २५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात आणखी ११ जणांचा बळी गेला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment