घरात घुसून त्याने तिची साडी ओढली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील डोंगरगाव परिसरात राहणाऱ्या एक २५ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीच्या घरात घुसुन तिची साडी ओढून तिला लज्जा उत्पत्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.

तसेच पिडीत तरुणीचा पती व सासरा यांना लाकडी काठी व बॅटने मारहाण केली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून काल अकोले पोलिसात आरोपी दशरथ तुकाराम चिकणे, विशाल दशरथ चिकणे, भीमराव गायकवाड,

संतोष भीमराव गायकवाड, विजय गायकवाड, सर्व रा.डोंगरगाव यांच्या विरुद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.गोराणे हे करत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment