EntertainmentIndia

रियाच्या टी-शर्टवर होता ‘तो’ मेसेज; कुणासाठी होता ‘तो’ संदेश? वाचा..

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रकाराने समोर आली. या प्रकरणी CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत. यामध्ये रिया चक्रवर्ती व तिची फॅमिली जास्त टार्गेट केली जात आहे.

कारण संशयाची सुई सध्या त्यांच्यावर आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.

ड्रग पेडलरशी संबंध असल्यामुळे रिया चक्रवर्तीवर कारवाई करण्यात आली आहे. सकाळी रिया मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली

त्यावेळी तिने परिधान केलेल्या टी-शर्टची व त्यावर असणाऱ्या मेसेजची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. रिया चक्रवर्तीने आज चौकशीला सामोरे जाताना काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्यावर ‘गुलाब लाल असतात,

व्हॉयलेट निळे असतात, तू आणि मी मिळून पितृसत्ताक व्यवस्थेला हाणू.’ असा मजकूर लिहिला आहे. यातील लाल गुलाब आणि व्होयलेट निळा या रंगांचा संबंध हा प्रेमाशी प्रेमभावनेशी जोडण्यात येतो.

तर यातील दुसरी लाईन ही पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारण्याबाबत आहे. रियाने हा मजकूर लिहिलेला टी-शर्ट कोणता आणि कोणाला संदेश देण्यासाठी घातला होता याचा उलगडा अजून झालेला नाही.

पण, या टी-शर्टमुळे ती कोणाविरुद्ध तरी बंड करत असल्याचा संदेश जातो. दरम्यान, यावरून राजकारणही तापले आहे. विरोधकांनी आता ठाकरे सरकारवर तोफ डागत टीकेची झोड उठवली आहे. या राजकारणावरून सामन्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button