Ahmednagar NewsAhmednagar South

कुकडी पाणी संदर्भात आनंदाची बातमी; आता….

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-  कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांसाठी कुकडी प्रकल्प डावा कालवा म्हणजे अमृतमय वरदान आहे. त्यामुळे येथील अनेक भाग हिरवागार झाला आहे.

आता आ. रोहित पवार यांच्या नियोजन व पाठपुराव्यामुळे याबद्दलचा एक प्रश्न मार्गी लागला आहे. तो म्हणजे डावा कालव्याच्या विभागलेल्या कर्जत व श्रीगोंदा क्षेत्राच्या पाणी नियोजनासाठी आता स्वतंत्र कार्यालयाला शासनाने मान्यता दिली आहे.

शासनाच्या मान्यतेनुसार श्रीगोंदा कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनच्या अंतर्गत असलेल्या राशीन कुकडी पाटबंधारे उपविभागाचे प्रशासकीय नियंत्रण, यंत्रसामुग्री व साधनसामग्री ही स्वतंत्ररित्या कोळवडी याच विभागाकडे सोपवण्यात आली असून श्रीगोंदा आणि कोळवडी कार्यालयाची स्वतंत्र विभागणी करण्यात आली आहे.

कुळधरण सिंचन शाखा कुळधरण, येसवडी सिंचन शाखा क्रमांक एक कुळधरण, येसवडी सिंचन शाखा क्रमांक दोन राशीन या तीन शाखांचे या मंडळांतर्गतच कार्यकारी अभियंता कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी या विभागाकडे हे कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे.

त्यामुळे कर्जत आणि श्रीगोंदा या दोन्ही तालुक्यांच्या कुकडीच्या पाणी नियोजनाचा स्वतंत्र मार्ग मोकळा आणि सोयीस्कर झाला आहे.

‘ काय होणार फायदा ?:- त्यामुळे आजपर्यंत कुकडीच्या पाणी नियोजनात विस्कटलेल्या घडीवर योग्य मेळ बसणार आहे. श्रीगोंदा येथील अधिकार्‍यांना त्याच तालुक्यातील शेतकर्‍यांवर योग्य लक्ष देता येणार आहे.

कुकडी डावा कालव्याचे एकुण लाभक्षेत्र हे 29 हजार 989 हेक्टर आहे. कर्जत तालुक्यातील कोळवडीच्या कुकडी बांधकाम विभागाकडे कालव्याचे बांधकामाधीन क्षेत्र आहे. मात्र हे क्षेत्र श्रीगोंदा व कोळवडी या दोन कार्यालयांमध्ये विभागलेले आहे. कार्यालयांच्या या विभागणीमुळे कुकडीच्या

लाभार्थी शेतकर्‍यांना या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडविण्यास अडथळा निर्माण होत होता. शेतकरी व अधिकारी यांचाही मेळ बसत नव्हता. आवर्तन सुटल्यानंतर पाणी वाटपाबाबत दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये समन्वय राहत नसल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता हे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button