शहर लॉकडाऊन करण्यासाठी नगराध्यक्षानी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :-लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर नागरिकांनी नियम मात्र अनलॉक केल्याने कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडत आहे.

त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांसह कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडली पाहिजे त्याकरिता दहा दिवसांचा लॉकडाऊन घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.

आदिक यांनी मंगळवारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,दोन दिवसांपासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या पन्नाशी ओलांडत आहे. शुक्रवारी श्रीरामपूर शहरात उच्चांकी म्हणजे ४३ जण पॉझिटिव्ह आढळले.

शहरात समूह संक्रमणाच्या दिशेने शहराची वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात १० दिवस लॉकडाऊन करुन, जनता कर्फ्यू करावा,

अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लाॅकडाऊन घेणेबाबत सर्वपक्षीयांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment