अंघोळीसाठी गेलेला एकजण प्रवरेत बुडाला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस जोरदार झाल्याने सर्वत्र पाणीसाठे भरलेले आहेत. बऱ्याचदा पाण्याचा अंदाज न आल्याने याठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत.

आता पाचेगाव येथील व्यक्ती अंघोळीसाठी प्रवरा नदीत गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्घटना बुधवारी घडली. बाळासाहेब धोंडीराम माळी (वय 57 वर्षे) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

स्थानिक युवकांकडून या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मुळा धरणातून मुळा नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असल्याने प्रवरा नदीत पाण्याचा वेग जास्त आहे.

रात्र झाल्यामुळे गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे. सदर घटनास्थळी नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तलाठी गणेश जाधव, पोलीस नाईक ज्ञानेश्वर देवकाते यांनी भेट दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment