लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु करुन विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, सुभाष घोरपडे, विशाळ साळवे, युवराज अवचार, जयवंत गायकवाड,

विनोद साळवे आदी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून संपूर्ण देश टाळेबंदीत होता. सध्या टाळेबंदी हटत असताना 1 सप्टेंबर पासून बर्‍यापैकी सवलत नागरिकांना देण्यात आली आहे.

शासकीय, खाजगी स्तरावर अनेक सेवा उद्योग, व्यवसाय सध्या सुरू आहेत. सर्व स्तरावर जनजीवन सुरळीत होत असताना महाराष्ट्रात अजूनही शाळा, महाविद्यालये बंदच आहेत.

त्यामुळे पुढच्या पिढीचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शाळा व महाविद्यालये पुर्ववत सुरु होण्याची आवश्यकता आहे.

राज्य सरकारने आरोग्यविषयक निर्बंध लावून शाळा, महाविद्यालय सुरू करावे व सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे,

तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment