जायकवाडी धरणावर आता ठेकेदाराचे व्यवस्थापन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- यावर्षी मान्सूनने सर्वदूर हजेरी लावली. सातत्याने पडणाऱ्या या पावसाने जिल्ह्यातील तसेच लगतची सगळीच धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे एक समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

परंतु आता या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज आसल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक सिंचन महामंडळाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही दोन तलावांच्या व्यवस्थापनासाठी खासगी ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी निविदा तयार कराव्यात, असे आदेश जलसंपदा विभागाकडून देण्यात आले आहेत.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ,औरंगाबादचे कार्यकारी संचालक यांनी पत्र क्र. गोमपाविम/ सिंचन/3462 दि. 10 ऑगस्ट 2020 उपरोक्त विषयान्वयेचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानंतर यासंदर्भात दि.13 व 18 ऑगस्ट 2020 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखालील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या

बैठकीत याबाबतच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . या बैठकीतील चर्चेनुसार सिंचन व्यवस्थापन बाह्य अभिकरणा मार्फत करण्यासाठी सिंचन व्यवस्थापन प्रती दलघमी या एककासाठी ठेकेदाराची निविदा मागविणे आणि सिंचन व्यवस्थापन बाब निहाय करणेसाठी

टक्केवारी पध्दतीने निविदा मागविणे हे दोन पर्याय अवलंबविण्यात यावेत असे ठरले आहे. सिंचन महामंडळाच्या अधिनियमातील तरतूदीनुसार निविदा प्रक्रिया करण्याचे अधिकार महामंडळास आहेत. दिनांक 17 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार सिंचन व्यवस्थापन महामंडळाकडे वर्ग केले आहे .

त्यानुसार प्रारुप निविदा संच तयार करण्यात यावे. सदरचे काम हे नाविन्यपूर्ण व प्रायोगिक तत्वावर असल्याने महामंडळाने त्यांचे स्तरावर स्थलकालपरत्वे सुयोग्य तरतूदी करुन प्रारुप निविदा संच तयार करावेत . उपरोक्त निविदा कार्यवाही दि.15 सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. जेणेकरुन रब्बी हंगामापासून महामंडळ निहाय , दोन प्रकल्पांवर प्रत्येकी एक पर्याय प्रमाणे निविदा निश्चिती करता येईल.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment