पंगा पडेगा महेंगा… तुझा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिच्या अडचणीत आता आणखीच वाढ झाली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी आग ओकणाऱ्या कंगना विरोधात शिवसेना एकटवली असून तिचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. नगरमध्ये शिवसेनेने आज कंगनाचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन केले.

तसेच हा फ्लेक्स जाळून टाकत तिच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यापुढे कंगनाचा कुठलाही चित्रपट नगरमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने यावेळी दिला.

त्यामुळे कंगनाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचलेला असतानाच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा दिसून आली कंगना विरोधात काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कारवाईचे निवदेन देण्यासाठी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह संजय शेंडगे, शाम नळकांडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड,

योगीराज गाडे, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुषमा पडोळे आदींचा समावेश होता. हे निवेदन देण्यासाठी मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदी नव्हते.

तर, आज नेताजी सुभाष चौकात शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बोराटे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. या आंदोलनात मात्र माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह काल पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेलेले अनेक पदाधिकारी नव्हते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment