कुटुंबीय झोपेत असतानाच तिला पळवण्यात आले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील देसवडे व सारोळा आडवाई येथून १७ वर्षांच्या दोन मुली बेपत्ता झाल्या. शेरी कासारे येथून ३ सप्टेंबरला १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दाखल केली होती.

या मुलीचा शोध सुरू असतानाच देवसडे व सारोळा आडवाई येथूनही दोन मुलींचे अपहरण झाल्याने पोलिस चक्रावले आहेत. देसवडे येथील मुलीचे २ सप्टेंबरला रात्री अपहरण झाले.

कुटुंबीय झोपेत असतानाच तिला पळवण्यात आले. सारोळा आडवाई येथील मुलीचे गुरूवारी सकाळी १० वाजता अपहरण झाले. मुलीचे पालक शेतात गेले असताना जामगाव येथून मैत्रिणीच्या घरून वह्या घेऊन येते,

असे सांगून मुलगी घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. पालकांनी मैत्रीण, तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता मुलीचा शोध लागला नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment