‘तो’ पाऊस संशयाच्या भोवर्‍यात अन… गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे पर्जन्यमापक मशीन बसविण्यात आले आहे. पावसाची योग्य नोंद व्हावी या उद्देशाने हे करण्यात आलेली सुविधा होती. परंतु यात मागील पाच दिवस काही सेकंदात पाऊस पडल्याची नोंद होत होती.

मात्र ही नोंद होताना झालेला पाऊस हा प्रत्येक वेळेस 2-3 सेकंदातच होत होता, यावरून सदरील पाऊस हा संशयाच्या भोवर्‍यात आला व या महसूल मंडलाचे हवामान यंत्र तपासले असता या मशीनमध्ये अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याचे

लक्षात आल्याने याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या संपत्तीमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी आय. पी. सी. 427 अतंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्थानिक पातळीवर जाऊन चौकशी करण्यात आली. या चौकशीत असे दिसून आले की या कालावधीत प्रत्यक्षात काहीच पाऊस झालेला नव्हता. वास्तविक 2 सेकंदात इतका पाऊस झाला तर प्रचंड नुकसान व्हावयास हवे होते.

संबंधीत 5 दिवस झालेला पाऊस हा अज्ञात इसमाद्वारे मशीनमधील पर्जन्यमापक यंत्रामध्ये पाणी ओतून ,दिशाभूल करून पावसाची नोंद वाढविण्यासाठी केला असल्याचे निष्पन्न झाले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment