राहुरी शहरात लॉकडाऊन; नागरिकांचा स्वेच्छेने उदंड प्रतिसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर, श्रीरामपूर हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले.

ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.

या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील व्यापारी संघटना व सर्वपक्षीय नागरिकांच्यावतीने करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनला काल राहुरी बाजारपेठ व शहराने कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिला.

या बंदच्या निर्णयास राहुरीतील काही संघटनांनी विरोध करून दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु राहुरीच्या आरोग्यासाठी राहुरीकरांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय बहुतांश व्यापार्‍यांनी मान्य करीत कडकडीत बंद पाळून लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आवक-जावक वाढल्याने व नागरिकांमध्ये थोडी काळजी घेण्याचे प्रमाण कमी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे.

शहरातील व्यापारी संघटना तसेच इतर मान्यवरांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाऊन बाबतच्या निर्णयासाठी बैठक घेण्यात आली.

यामध्ये सर्वानुमते गुरुवार ते पुढचा गुरुवार याप्रमाणे आठदिवस राहुरी बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नागरिकांची त्यास प्रतिसाद देत हा बंद यशस्वी केला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment