अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात दोघांचा मृत्यु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबे आखाडा इथं भरधाव वेगानं चाललेल्या डंपरनं दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

शरद कणगरे (वय 35) आणि अनिल पंडित (वय 45, दोघे रा. उंबरे, माळेवाडी) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

डंपर चालकाला पकडले असताना तो नशेत होता, असे काहींनी सांगितले. शरद कणगरे यांच्या पश्‍चात पत्नी, आईवडील, दोन मुली, मुलगा, तर अनिल पंडित यांच्या पश्‍चात पत्नी, सहा मुली असा परिवार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment