अहमदनगर ब्रेकिंग : तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अकोले पोलिसांनी धडक कारवाई करत तालुक्यातून संगमनेर येथे काळ्या बाजारात जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक पकडला. यावेळी ट्रकमध्ये साडे 12 टन तांदूळ गोण्यात भरलेला होता.

सदरचा तांदुळ हा रेशनचा असल्याच्या संशयाने हा तांदुळ पकडला. मात्र हा तांदुळ रेशनचा आहे की आणखी कशाचा? याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकारी राकेश रावते यांनी दिली.

ट्रकमध्ये साडे बारा टन तांदूळ गोण्यात भरलेला होता. काळ्या बाजारातील रेशनचा हा तांदूळ घेऊन ट्रक जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी लगेच पथक पाठवून कारवाई केली. राजूर येथून संगमनेरला जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक (एम.एच.१७ ए.जी.२४८३) मनोहरपर फाटा येथे पकडून अकोले पोलिस स्टेशनला आणण्यात आला आहे.

यावेळी चालक शहेबाज मणियार याने सदर तांदूळ हा राजूर येथून आणला असल्याचे सांगितल्याचे समजते. सदर घटनेची माहिती समजताच

उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी अकोले पोलिस स्टेशन भेट देऊन चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे सुचना दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment