Ahmednagar NewsPolitics

अहमदनगर राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचा मनसेत प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- तालुक्यातील जामगावच्या येथील रहिवासी असलेल्या व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रविवार दि.13 सप्टेंबर रोजी मनसेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे पक्षप्रवेश करत मनसेची वाट धरली.

गेल्या अनेक दिवसांपासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश लांबला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पारनेरच्या व जिल्हा राजकारणात सक्रिय होते.तसेच त्यांच्या पत्नी जामगावच्या माजी उपसरपंचसह बाजार समिती निवडणुक लढविली होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पारनेरचे राजकारण पार ढवळले असून या गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी रविवारी मनसेचे नेते,

माजी मंत्री बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे पक्षप्रवेश करीत मनसेची वाट धरली.यावेळी तालुक्यातील बाळासाहेब माळी यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button