Ahmednagar NewsAhmednagar SouthCorona Virus Marathi News

संशयित रुग्णांची कोरोना चाचणी गावा बाहेर करा

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गावपातळीवर कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

पाथर्डी शहरातील लोक वर्दळीच्या जागी तालुक्याचे उपजिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे येथील परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना संशयित रुग्णाची या ठिकाणी मोठी गर्दी येथे होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना धोका संभवणार आहे.

त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी केंद्र गावा बाहेर हलवण्याचे मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्याकडे देण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाच्या उपलब्ध असलेल्या महाविद्यालये, शाळा, मंगल कार्यालये अश्या गावाबाहेर असलेल्या ठिकाणी

कोरोनाची चाचणी करण्यात यावी. अशी मागणी किशोर हरेर, शहानवान शेख, माजी नगरसेवक रामनाथ बंग, अभिजीत गुजर यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button