कमरेचा चाकू काढला आणि त्याच्या पोटात खुपसला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- सिनेमा पाहून आजकाल अनेक तरुणवर्ग यामधील घटनांचे अनुकरण गुन्ह्यासाठी करत. आपल्याला आलेल्या रागाचा पार एवढा चढला कि तो थेट त्याच्या जीवावरच उठला, अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने राहाता येथील फोटोग्राफरवर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयता, लाकडी दांडके, घेऊन फिर्यादीच्या मामाच्या घरावर हल्ला करत कुटुंबांतील लोकांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली.

सविस्तर घटना अशी कि, शहरातील नवनाथ नगर परिसरात ब्रम्हा दत्तप्रसाद शिंदे ,(वय 22) राहणार राहाता याची तुषार भोसले हा मस्करी करत होता. शिंदे याने आपली मस्करी करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने तुषार भोसले, योगेश वाघमारे, संदीप काकडे, सोन्या जाधव, अक्षय पगारे, रोहीत पगारे, आकाश गायकवाड,

शुभम वाघमारे व इतर दोन तीन जणांना बोलावून घेऊन त्यांनी फिर्यादीस मारण्यास सुरूवात केली. मारहाण होत असताना शिंदे याने प्रतिकार केला असता योगेश वाघमारे याने तुला जिवंत सोडत नाही, मारूनच टाकतो, असे म्हणत कमरेचा चाकू काढून फिर्यादीच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी जखमी होऊन जमिनीवर कोसळला असता त्याच्यावर पुन्हा वार केले. कसा बसा जीव वाचवून फिर्यादी घरी पळून आला व मामा सोबत पोलीस स्टेशनला जायला निघाला असता यातील आरोपी व काकडेबाई हे घरी येऊन तू जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाची तक्रार दाखल करील अशी धमकी दिली.

फिर्यादी शिर्डी येथे उपचारासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन कोयता, काठ्या, लाकडी दांडे, दगडफेक करत घरावर हल्ला केला तसेच फिर्यादीचे मामा यांच्या डोक्यात वार करून जखमी केले. व कुटुंबातील लोकांनाही मारहाण केली.

या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असून या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक भोये करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment