तिच्या दुर्दैवी मृत्यूने लेकरांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असल्याने बहुतांश ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र शेतीच्या काम करत असताना एका विवाहित तरुणीचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, बाजरीचे खळे करत असताना मळणी मशिनच्या मागील बाजूला चाळणीतील काढ काढण्यासाठी गेलेल्या विवाहीत महिलेचा मळणी यंत्राच्या शॉप्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे.

हि दुदैवी घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. विजया वैभव काकडे (वय २४ वर्ष ) असे मृत पावलेल्या विवाहीत तरूणीचे नाव आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काकडे या शेतकऱ्याचे बाजरी पिकाचे खळे सुरू होते. यावेळी मशिनमध्ये चाळणीतील काढ काढण्यासाठी विजया काकडे (वय 24) ही महिला मळणी मशिनजवळ गेली होती.

त्यावेळी त्यांनी डोक्याला बांधलेले फडके मशिनच्या शॉप्टमध्ये अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या विजया यांना लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिच्या मागे एक तीन वर्षाची व एक अकरा महीन्याची अशा दोन मुली आहे .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment