दिव्यांगांच्या मदतीस धावली मनसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने दिव्यांग व्यक्तीस स्टॉल टपरी देऊन त्यांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मनसेचे सुमित वर्मा म्हणाले कष्ट करण्याची तयारी त्यांच्यात आहे, त्यामुळेच अशा व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता हे काम शासन, महापालिका यांचे आहे. दिव्यांगासाठीच्या अनेक योजना आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही.

परंतु मनसे विद्यार्थी सेना याबाबतही आवाज उठवून दिव्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. यावेळी सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,

नानासाहेब डोंगरे, सागर शिरपुर, सावली संस्थेचे चाँद शेख, बाहुबली वायकर, अर्चना वायकर आदींसह अनेकजण उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment