जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी जनता कर्फ्यूला सकारत्मक प्रतिसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात होती.

यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पुकारलेला जनता कर्फ्यूला नागरिकांनी सकारात्मक साथ दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व पक्षियांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या बंदला रविवारच्या जनता कर्फ्यूने सुरुवात झाली, त्यास शहरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

मात्र माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी घेतलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर बंदबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे. काल शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील दुकाने कडकडीत बंद होती. फळविक्रेत्यांच्या गाड्या आणि बेकरी वाल्यांची दुकाने सकाळी अपवादात्मकरित्या सुरू होती.

मात्र दिवसभर शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. यावेळी अनेक राजकीय नेतेमंडळींनी राजकारण बाजूला सारत या जनता कर्फ्यूला साथ दिली. मात्र याच बंदला आजी-माजी आमदारांचा विरोध आहे.

दरम्यान किराणा दुकानदारांनी सुद्धा ठराविक दोन-तीन तास दुकान उघडे ठेवावे नंतर बंद करावं. दूधवाले, भाजीपालावाले यांनी सकाळी आपली सेवा पुरवावी. त्यानंतर मात्र बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे. दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बंदला विरोध करून ज्या व्यापार्‍यांना दुकाने सुरु ठेवायची त्यांनी ठेवावी,

अडचण आल्यास आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर शनिवारी शहरात फिरुन व्यापार्‍यांच्या भेटीही घेतल्या. बंदच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा श्री. मुरकुटे यांनी दिला आहे, शिवाय काही व्यावसायिकांनी या बंदला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment