Ahmednagar NewsBreakingMaharashtraPolitics

मनसे स्टाईल! राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय फोडले

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर – पाथर्डी शहरातील मुख्य चौकासह उपनगरातील रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे रोजच अपघात होत असून निरपराध नागरिकांचे बळी जात आहे.

तसेच कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे पाथर्डी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी येथील महामार्गाच्या कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घातला व कार्यालयाचीही तोडफोड केली

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मनसे आंदोलनकर्त्यांना उत्तर देण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त होत कार्यालयातील खुर्च्याची मोडतोड केली.

टेबलवरील काच फोडली. तसेच शेजारीच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयात जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष परिवहन अविनाश पालवे, शहरसचिव संदीप काकडे, राजू गिरी,

सोमनाथ फासे, जयंत बाबर, गणेश कराडकर, एकनाथ सानप, संजय चौनापुरे, एकनाथ भंडारी, रंगनाथ वांढेकर, बाबासाहेब सांगळे आधी आंदोलनात सहभागी झाले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button