विजेच्या लपंडावाने नागरिक वैतागले; अधिकाऱ्याला घेतले रिंगणात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-  वार सुटो अथवा भुरभुर पाऊस येऊ लाईट लगेच जाणार जे नित्याचेच झाले आहे. मात्र एकदा गेलेली वीज तासंतास येत नसल्याने वैतागलेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

हा प्रकार पाथर्डीमध्ये घडला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या आठ दिवसापासून शहरातील विजेच्या सुरू असलेल्या लपंडावच्या पार्श्‍वभूमीवर माजी नगराध्यक्ष

अभय आव्हाड व नगरसेवक रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखालील शेकडो नागरिकांनी वीज महामंडळाच्या कार्यालयात जाऊन विज महामंडळाचे सहाय्यक अभियंता मयुर जाधव यांना घेराव घातला.

सध्या शहरातील वीजपुरवठ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले. वीज पुरवठा सतत खंडित होणे, कमी-अधिक प्रमाणात वीज पुरवठा होणे यामुळे घरातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जळून नारिकांचे नुकसान झाले.

विजबिल भरूनही वीज महामंडळाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. वीज पुरवठा कायम खंडित होत असल्याने रात्री शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न केल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला. यावेळी विज महामंडळाचे सहायक अभियंता मयूर जाधव म्हणाले ,

यापुढे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लवकरात लवकर सुरळीत करू, संबंधित विभागाचा वायरमन कामात कुचराई करत असल्यास कारवाई करू,

ज्या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असेल त्या परिसरातील नागरिकांना त्याबद्दल व्हाट्‌सअप मार्फत माहिती देऊ, असे आश्‍वासन यावेळी दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment