युवकांच्या भविष्यासाठी आ.रोहित पवारांनी घेतला हा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- प्रश्न कोणताही असो तो सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी युवकांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम सुरु केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन

‘पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण’ घेण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून राज्य पोलीस दलात मोठी भरती केली जाणार आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादीचे नेते

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड तालुक्यातील युवक-युवतींना ही मोफत संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात लेखी परीक्षा व शारीरिक क्षमता चाचणी,

अशी तयारी करून घेण्यात येणार आहे. लॉकडाउनच्या काळात लेखी परीक्षेतील मराठी, अंक गणित, बुद्धिमत्ता चाचणी तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित युवक-युवतींनी आपली नोंदणी करणे अनिवार्य असून, https://bit.ly/2fuz2P G या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या QR CODE वरूनही नोंदणी करता येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment