ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

0

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुययातील नांदूर पठार येथील रहिवासी असलेले व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम (मामा) घनदाट यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश झाला.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पारनेर तालुक्यातील नांदूरपठारचे भुमिपूत्र, माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी हाती घड्याळ बांधले आहे.

सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Advertisement

माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत. दरम्यान,घनदाट मामा हे पारनेर तालुक्यातील भुमिपूत्र आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या प्रवेशाचा फायदा तालुका राष्ट्रवादीलाही होणार आहे.

Advertisement

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते.

Advertisement

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li