बाळासाहेब नाहाटा यांच्यावर गुन्हा दाखल, वाचा नक्की काय केल कि…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- लोणी व्यंकनाथमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपाचा कार्यक्रम विनापरवाना आयोजित करून गर्दी जमवल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा,

तसेच जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकाऱ्यांसह तीस ते चाळीस जणांच्या विरोधात मंगळवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कार्यक्रमाचा रिक्षामधून भोंगा लावून प्रचार सुरू होता. याबाबत एक दिवस अगोदर गुन्हा दाखल असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी कर्जवाटप कार्यक्रम केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नाहाटा यांच्यासह मोहन आनंदराव काकडे, आशिष अंकुश लडकत, जगताप, शिंदे आदींचा समावेश आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment