आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पुन्हा रडण्याची वेळ येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळून शेतकरी अडचणीत सापडला आहे.

केंद्राच्या मोदी प्रणित भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर कांदा निर्यात बंदीच्या परिपत्रकाची होळी करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांना पोलीसांनी अटक केली.

या आंदोलनात अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, कार्तिक पासलकर सहभागी झाले होते. देशात अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.

ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत होती. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे.

केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळणार असून, याचा फटका कांदा उत्पादक शेतकरींना बसणार असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राने निर्यातबंदी उठवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दोन पैसे मिळू लागले होते.

मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पुन्हा रडण्याची वेळ येणार आहे. केंद्र सरकार चुकीचे शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना आत्महत्येच्या खाईत लोटत असल्याचा आरोप अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांनी व्यक्त केला.

आंदोलन कर्त्यांना अटक करुन कोतवाली पोलीस स्टेशनला आनण्यात आले होते. दुपारी उशीरा आंदोलकांना सोडून देण्यात आले. केंद्र सरकारने तातडीने कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी अन्यथा शेतकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment