फक्त ट्रक खचल्याने बायपास झाला तब्बल १२ तास बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  बाह्यवळण रस्त्यावरील अरणगाव ते वाळुंजदरम्यान सोमवारी सकाळी ९ वाजता ट्रक खचल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. बारा तास वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे शंकरसिंह रजपूत, गोरख कल्हापुरे यांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १० वाजता वाहतूक सुरू झाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे सगळे घडत असल्याने आंदोलनाचा इशारा कार्ले यांनी दिला. अनेक आंदोलने झाल्यानंतर बायपासची डागडुजी करून तो सुरू करण्यात आला आहे.

अरणगाव ते वाळुंजदरम्यानचा रस्ता मात्र कच्चाच राहिला आहे. वर्षापूर्वी या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी धुळीच्या त्रासाला कंटाळून जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ,

बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी दोन महिन्यांत डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते, पण अद्यापही त्याला मुहूर्त लागलेला नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment