निवडणुकीचे बिगुल वाजले! महापालिकेच्या ‘या’ पदासाठी 25 सप्टेंबरला निवडणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. हि निवडणूक येत्या 25 सप्टेंबला निवडणूक होणार आहे.

याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार सभापती निवडणूक रखडली होती.

काही दिवसांपूर्वीच शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती.त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून 25 सप्टेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, त्यांच्याकडूनच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment