बिग ब्रेकिंग : मनोज पाटील अहमदनगरचे नवे पोलिस अधीक्षक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  

सोलापूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय असे काम त्यांनी केले असून 15 ऑगस्ट 2018 ते 26 जानेवारी 2019 या वर्षाचा शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पोलिस शौर्यपदकासाठी उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती यांच्या कडून पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. 

तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांना 26 जानेवारी 2019 रोजी गुणवत्तापूर्ण सेवेतील पोलिस म्हणून राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले होते.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हे गुणवत्तापूर्ण सेवा बजावल्याचे राष्ट्रपती पदक पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment