तुमचा छापखाना बंद करा; पालकमंत्र्यांनी दिला इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली आहे. चांगले उपचार मिळावे यासाठी रुग्ण पर्यंत करत आहे. मात्र याच गोष्टीचा फायदा घेत रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी संबंधितांना कडक इशारा दिला आहे. खासगी दवाखान्यांतून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी असल्याने या रुग्णालयांचे ऑडिट सुरू केले आहे.

पण डॉक्टरांनी नोटा छापणे बंद करून माणुसकी दाखवण्याची गरज आहे. त्यांना परवडत नसेल तर शासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा केला पाहिजे.

काम बंद करणे वा उपचार बंद करण्यासारखे प्रकार केले तर मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिला.

आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, डॉक्टरांना एमएमबीएस,

बीएचएमएस, बीडीएस वा अन्य वैद्यकीय पदवी मिळण्यासाठी शासनाचाही पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांनी काम बंदसारखे पाऊल उचलणे योग्य नाही. नाही तर शासनाला अत्यावश्यक सेवा कायदा-मेस्मा लागू करावा लागेल,

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment