चक्क रस्ता खोदत त्याने पाण्याला वाट दिली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीच पाणीच झाले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे शेतात साचलेले पावसाचे पाणी बाहेर निघत नसल्याने पिके अक्षरशः सडली. पिकांवर आतापर्यंत झालेला खर्चही पाण्यात गेला.

याबाबत शासन- प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणी दखल न घेतल्याने जेरीस आलेल्या एका शेतकऱ्याने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कोल्हार- तिसगाववाडी रस्ता खोदत पाण्याला वाट मोकळी करून दिली.

पावसामुळे कोल्हारमधील वस्तीवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिसरातील घरे, जनावरांचे गोठे, शेती जलमय झाली. शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्याचा मोठा आर्थिक फटका बसला.

त्यांनी याबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोल्हार येथील नुकसानीच्या पहाणी दौऱ्याच्या गाऱ्हाणे मांडले होते. काही शेतकऱ्यांनी रस्ता खोदला.

परंतु पूर्वेकडे पाणी काढू देण्यास काही जण आडवे आल्याने रस्ता खोदूनही काहीच उपयोग झाला नाही. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हा रस्ता खोदल्यामुळे तिसगाववाडी, ओम गुरुदेवनगर, कैवल्यधाम, मनाबाबा खर्डे वस्ती, वसंत भगवंत खर्डे, रांधवणे वस्ती भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना गावात येण्यासाठी आता तब्बल चार- पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment