HealthLifestyle

ताप दूर करण्यासह ‘ह्या’ समस्यादेखील दूर करते लिंबू; वाचा…

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-लिंबू आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. खास करून गर्मीच्या दिवसांमध्ये तर फारच लाभदायक आहे. लिंबू पाणी शरीरात पचक द्रव्यांना बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो.

हे पचन क्रिया उत्तम ठेवण्यासाठी देखील मदतगार आहे. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी ने भरपूर असत. तसेच यात एंटी-ऑक्सीडेंटचे गुण देखील असतात.

ज्याने त्वचेचे डाग दूर होण्यास मदत मिळते आणि त्वचेत निखार येतो. लिंबूमध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात.

लिंबू अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो आणि विशेषत: उन्हाळ्यात लिंबाचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. जाणून घेवुयात या विषयी-

  • १) पाचक शक्ती सुधारते – लिंबामध्ये काही महत्वाचे घटक असतात जी यकृतातील पित्ताचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे पचन प्रणाली मजबूत होते. अपचन, गॅस, आंबट ढेकर येणे यासारख्या अडचणी दूर होतील.
  • २) वजन नियंत्रित करते – आजकाल वजन वाढणे सामान्य समस्या झाली आहे. वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी 1 ग्लास पाणी 1 लिंबू आणि 1 चमचे मध मिसळा, आणि प्या. आपले वजन नियंत्रित होईल. लिंबामध्ये आढळणारे पेक्टिन फायबर भूक कमी करते, ज्यामुळे लठ्ठपणाच्या तक्रारी कमी करतात.
  • ३) थकवा कमी होतो – लिंबामध्ये असलेले पोषकद्रव्य हायड्रेटेड आणि ऑक्सिजनने भरलेले असतात जे आपल्या शरीरास उर्जा देतात आणि ही उर्जा आपल्याला थकवा येण्यापासून वाचवते.
  • ४) शरीराचे तापमान नियंत्रित करते – ताप, सर्दी, फ्लू असल्यास लिंबाचा रस प्यायला पाहिजे कारण यामुळे शरीरातील हानिकारक संक्रमण कमी होते, यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि ताप कमी होतो.
  • ५) दम्यामध्ये फायदा – जर तुम्ही श्वसनाचे रुग्ण असाल तर तुम्ही लिंबाचे सेवन केले पाहिजे. कारण लिंबामुळे दम्याने ग्रस्त झालेल्या माणसाची अस्वस्थता कमी होते आणि त्याला आराम मिळतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button