पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोधर मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमिताने भाजपने तसेच कार्यकर्त्यांनी देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

याच पार्श्वभूमीवर नगरचे भाजप जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नगर मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सावेडीमधील वॉर्ड क्र. ६ मधील सिद्धिविनायक सोसायटीत नगरसेविका पल्लवी जाधव यांनी स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण केले.

त्याचबरोबर शहरातील ठिकठिकाणी रक्तदान शिबीर, अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,

महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई  ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर ,नगरसेवक मनोज दुलम, मनोज साठे ,नगरसेविका पल्लवीताई जाधव,वंदनाताई ताठे,

भाजप कार्यकारणी सदस्या स्वाती पवळे, कुलदीप कुलकर्णी, पुष्कर कुलकर्णी, डॉ. मनोहर देशपांडे, डॉ. जगदाळे, पालिकेचे कर्मचारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment