पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा करणार असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून

या सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धना बरोबरच प्लॅस्टिक मुक्ततेचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून संपन्न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतला.त्यानूसार राज्यातही

विविध सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करून समाज घटकांपर्यत पोहचण्याचा निर्णय भाजपाच्या वतीने घेण्यात आला असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये दिव्यांगाना साहीत्याची मदत, वृक्षारोपण रक्तदान शिबीर,

स्वच्छता अभियानातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश,रुग्णांना फळ वाटप तसेच प्लाझ्मा दान करण्याचे उपक्रम कार्यकर्त्यानी आयोजित करावेत असे आवाहन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या सहा वर्षाच्या वाटचालीत सामान्य माणसाचा विचार करून त्यादृष्टीने निर्णय घेतले.त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रतिमा जगाच्या पाठीवर ठळकपणे उठुन दिसलीच,

पण यापेक्षाही कोव्हीड १९ च्या संकटाचा सामना करताना आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली.

७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीना शुभेच्छा देण्याचा संकल्प केला असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment