Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingCrimeMaharashtra

गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तक्रारदारच बनला जासूस

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे.

मात्र अशाच गुन्हा करणाऱ्या दोन भामट्यांचा गुन्हा उघडकीस आला आहे. शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटचे खोटे सही व शिक्के वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट प्रोजेक्ट करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चार्टर्ड अकाउंटंट विकास वैद्य यांनी स्वतःच स्टींग ऑपरेशन करून या दोघा भामट्यांचा पर्दाफाश केला आहे. याबाबत सविस्त माहिती अशी कि, विकास वैद्य हे संगमनेरात चार्टर्ड अकाउंटचा व्यवसाय करतात. वैद्य यांचे शहरातील सावतामाळी नगर येथे त्यांचे कार्यालय आहे.

15 सप्टेंबर रोजी ते ऑफिसमध्ये असताना रोहिदास विठ्ठल धुमाळ रा. अकोले हे त्यांच्या कामासाठी आले. धुमाळ यांनी त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट वैद्य यांना दाखवला असता या प्रोजेक्ट रिपोर्टवर वैद्य यांच्या फर्मचे बनावट शिक्के मारून खोट्या सह्या केल्याचे वैद्य यांच्या निदर्शनास आले.

हे प्रकरण कुठे बनवले, असे विचारले असता शहरातील विद्यानगर येथील गणेश भोसले यांच्याकडे हा प्रकल्प अहवाल बनवल्याचे धुमाळ यांनी सांगितले. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीए यांनी केली स्टिंग ऑपरेशन वैद्य यांनी स्वतःच ग्राहक बनून भोसले यांच्याकडे जाऊन खात्री केली.

भोसले यांच्या ऑफिसमध्ये त्यांना बनावट शिक्के दिसले.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या सही व शिक्क्याचा गैरवापर होत असल्याची खात्री होताच वैद्य यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वैद्य यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश दयानंद भोसले रा. पिंपरणे, ता. संगमनेर) व सुवर्णा अशोक वर्पे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button