मुसळधार पाऊस …जिल्ह्यातील अनेक नद्या व ओढ्यांना पूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- नगर शहरासह जिल्ह्यात बुधवारी व गुरूवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. नगरच्या सीना नदीसह जिल्ह्यातील अनेक नद्या व ओढ्यांना पूर आला आहे. घोडेगाव परिसराला बुधवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

मागील १०-१५ वर्षांत असा पाऊस झाला नव्हता. पत्रवाळी नदीला मोठा पूर आला. मध्यरात्री १२.३० वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील पुलावर अर्धा फूट पाणी होते. सोनई-घोडेगाव मार्गावरील पुलावर, तर ३ ते ४ फूट पाणी होते.

सकाळी ६ वाजताही पुलावर १ फूट पाणी होते. मिरी रोडवरील भालेराव हॉस्पिटलजवळ ३ फूट पाणी आले होते. आसपासच्या लोकवस्तीतही पाणी शिरले होते.

शंकरबाबा मंदिर रोडवरील ओढ्याला आलेल्या पुरामुळे डांबरी रस्ता वाहून गेला असून येणाऱ्या जाणाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले.

अनेक शेतांचे बांध फुटले, तर पिके भुईसपाट झाली. आणखी काही दिवस पाऊस होईल, असा वेधशाळेचा अंदाज असून त्यामुळे नुकसान वाढणार आहे. घोडेगाव येथील पुलावर पावसामुळे पाणी आल्यामुळे वाहतूक काही तास खोळंबली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment