Ahmednagar NewsAhmednagar SouthPolitics

सुजित झावरे पाटलांकडून तहसीलदारांना महिन्याला पन्नास हजारांची मागणी !

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- सरकारी कामात अडथळा, तसेच फोनवर अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याविरोधात गुरूवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दिली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी झावरे कार्यकर्त्यांसह सकाळी तहसील कार्यालयात गेले.

बैठक सोडून तहसीलदारांनी निवेदन स्वीकारावे, अशी आंदोलकांनी मागणी होती. बैठक सुरूच राहिल्याने झावरे यांनी आत घुसत देवरे यांच्यावर हप्तेखोरीचे आरोप केले.

आरोपामुळे देवरे संतप्त झाल्या. तुम्ही रात्री-बेरात्री फोन करता, अश्लिल भाषेत शिवीगाळ करता. रेकॉर्डींग माझ्याकडे अाहे, असे सांगत तहसीलदारांनी झावरे यांना सुनावले.

तहसीलदारांनी फिर्याद दाखल करू नये म्हणून झावरे यांच्यासह अन्य नेत्यांनी मनधरणी केली. बंद खोलीत वीस मिनिटे चर्चा झाली, परंतु त्यातून काहीच मार्ग निघाला नाही.

महिन्याला पन्नास हजारांची मागणी सुजित झावरे हे प्रत्येक महिन्याला आपणास पन्नास हजार रुपये द्यावेत, अशी मागणी करत. आपण बधत नाही,

असे लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करु, असे धमकावल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button