तरुणाने स्वतःला पेटवले व तिला घेतले मिठीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम असते. मात्र कधीकधी हे प्रेमच जीवावर उठते. त्याचे तिच्यावर प्रेम होते मात्र ती सातत्याने लग्नास नकार देत होती .

शेवटी तिच्या नकाराला वैतागून तरुणाने स्वतःला पेटून घेतले आणि त्या तरुणीला मिठी मारली. ही घटना जिल्ह्यातील शिर्डी येथे घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, सार्थक वसंत बनसोडे (वय २०, रा.साकुरी, ता.राहाता) हा दुचाकीवरून संबंधित तरुणीच्या घरासमोर गेला. तेथे त्याने या तरुणीला लग्नासाठी विचारणा केली.

मात्र तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे सार्थकने सोबत आणलेल्या ड्रममधील ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले व संबंधित तरुणी व तिच्या वडिलांना मिठी मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमध्ये सार्थक जवळपास 85 टक्के भाजला होता. उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर संबंधित तरुणी 35 टक्के भाजली असून तिचे वडील ही किरकोळ जखमी झाले आहेत.

या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment