Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : घराचे छत कोसळून वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला आहे.

घर कोसळल्याचा आवाज होताच जवळपास राहणाऱ्या लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलीस पाटलांनी सदर घटनेची खबर शेवगाव पोलिसांना देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

गावातील मंडळींनी खोरे, फावडे साहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नानाभाऊंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र लाकडी खांड, माती जास्त असल्याने

जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ढिगारा हटवावा लागला. नानाभाऊ कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सून सीताबाई या शेळ्या बांधण्यासाठी बाहेर गेल्याने त्या दोघी थोडक्यात बचावलेल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button